वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने घेतलेल्या निवडणूक रोखे संबंधीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकांची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली आहे. हे पीठ निवडणूक रोख्यांची घटनात्मक वैधता तपासून पाहणार आहे. या घटनापीठाचे नेतृत्व सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड करणार असून न्या. संजय किशन कौल, न्या. बी. आर. गवई, न्या. जे. बी. परदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा हे घटनापीठाचे सदस्य असतील. ही सुनावणी 31 ऑक्टोबरपासून सुरु केली जाणार आहे, अशी माहिती न्यायालयाने दिली आहे.









