हुबळी-धारवाड वॉर्ड समितीची विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : स्थानिक पातळीवरही नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात समित्यांची स्थापना करावी, या मागणीसाठी हुबळी-धारवाड येथील वॉर्ड समितीने सोमवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडले. प्रत्येक प्रभागातील समस्या, सुविधा, निधी आदींसाठी महापालिका कार्यक्षेत्रात स्थानिक समिती महत्त्वाची आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरपालिका प्रशासन मंत्री, नगरविकास मंत्री आदींना निवेदने देण्यात आली आहेत. याचा गांभीर्याने विचार करून प्रभाग समिती स्थापन करण्याला चालना द्यावी. अशी मागणी केली आहे. शहराचा विकास करण्यासाठी नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. दरम्यान, तक्रारींचे त्वरित निवारणासाठी स्थानिक पातळीवर प्रभागवार समित्या आवश्यक आहेत. प्रत्येक प्रभागात प्रभाग समित्यांची स्थापना करावी, अशी मागणी केली आहे.









