न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित दत्ताराम सडेकर प्रायोजित निंबध लेखन स्पर्धा पार पडली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अभियंता दत्ताराम सडेकर,सौ.सुहासिनी सडेकर,माजी संचालक विजय निगुडकर,वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक सौ.स्नेहा खानोलकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर उपस्थित होते.
मुलांनी उत्तम आरोग्यासाठी तसेच शारीरिक ,मानसिक ,संतुलन स्थिर राहण्यासाठी आणि देशाचे सुजाण नागरिक बनवण्यासाठी पहाटे उठून व्यायाम योगासने करावीत असे प्रतिपादन निवृत्त अभियंता दत्ताराम सडेकर यांनी मळगाव येथे केले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल आनंद देवळी पूजा राऊळ सुभाष तोरस्कर यांचे सहकार्य लाभले.









