वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एस्सार समुहाने आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील लिमिटेडला आपली काही बंदरे एका करारान्वये देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. सदरच्या कराराअंतर्गतचा व्यवहार हा 19 हजार कोटी रुपयांना झाला असल्याची माहिती आहे.
भारतामध्ये महामारीनंतरचा विलिनीकरण आणि अधिग्रहणाचा हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे बोलले जात आहे. एस्सार आपल्या ताफ्यात असलेली बंदरे आणि वीज व्यवस्था आर्सेलरला विक्री करणार आहे. या संदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये करारावर सहय़ा करण्यात आल्या आहेत.
मोठय़ा टर्मिनलसाठी भागीदारी
या कराराअंतर्गत गुजरातमध्ये हजिरा येथे 10 लाख टन वार्षिक क्षमतेचे एलएनजी टर्मिनल तयार करण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही कंपन्यांचा वाटा हा प्रत्येकी 50 टक्के इतका असणार आहे.