ब्रिटनमध्ये राहणारे केन प्रोउट या व्यक्तीवर जन्मापासून अत्यंत विचित्र अवस्था ओढवली आहे. या व्यक्तीने स्वत:चे जवळपास पूर्ण आयुष्य श्वसनावेळी होणाऱ्या त्रासासोबत काढले आहे. केन यांनी आजवर कधीच त्रासाशिवाय श्वास घेतलेला नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचा ब्रीथिंग प्रॉब्लेम नाही, प्रत्यक्षात त्यांच्या छातीतच पोट हा अवयव आहे.
72 वर्षीय केन यांना प्रारंभापासून श्वसनावेळी त्रास व्हायचा. त्यांना अखेर समस्या का आहे हेच समजत नव्हते. त्यांनी अनेक डॉक्टरांना स्वत:ची शारीरिक स्थिती दाखविली, परंतु तरीही त्यांना आराम मिळाला नव्हता. अखेरीस त्यांच्या शरीराला स्कॅन करण्यात आल्यावर त्यांना फ्रेनिक नर्व्हची समस्या असल्याचे उघड झाले. यात शरीराचे रेस्पिरेट्री मसल्सचे नुकसान होते. आता त्यांना एका गंभीर शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणार असून याद्वारे त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
केन हे ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्समध्ये कार्यरत राहिले आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास आयुष्यभर राहिला आहे. प्रत्यक्षात छातीतच पोट असल्याने त्यांच्या फुफ्फुसांना अधिक जागा मिळत नसल्याचे ही समस्या उद्भवल्याचे कळल्यावर ते हैराण झाले. शस्त्रक्रिया करविण्यापूर्वी केन यांनी स्वत:च्या आयुष्याची समस्या लोकांसोबत शेअर केली आहे. केन यांचे निम्मे डायाफ्राम पूर्वी काम करत नव्हते. तसेच छातीत पोट असल्याने खाल्लेले अन्न योग्यप्रकारे पचत नव्हते. केन यांनी आयुष्यातील निम्मा कालावधी श्वसनावेळी होणारा त्रास अन् उलट्या करण्यात घालविला आहे. परंतु या समस्येनंतरही त्यांनी वायुदलात सेवा बजावली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. केन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर केन हे सहजपणे श्वसन प्रक्रिया करू शकतील असे डॉक्टरांचे सांगणे आहे.









