कामगारमंत्री शिवराम हेब्बार यांची विधानसभेत माहिती : अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगाव जिल्ह्यातील मच्छे येथे ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे, अशी माहिती कामगारमंत्री शिवराम हेब्बार यांनी दिली. विधानसभेत बुधवारी प्रश्नोत्तर चर्चेवेळी उपस्थित झालेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मच्छे येथे ईएसआय हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने संमती दर्शविली होती. याठिकाणी 50 ते 100 बेड्स क्षमतेचे हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी 5 एकर जागेची आवश्यकता होती. त्याकरिता जमीनही उपलब्ध करून देण्यात आली. परंतु, केंद्रातील ईएसआय पथक जागेची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर दोन बाजूंना रस्ते नाहीत. त्यामुळे येथे हॉस्पिटल नको. त्याऐवजी बेळगावमधील अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटल आवारातच 2 एकर जागा उपलब्ध करून हॉस्पिटलची नवी इमारत निर्माण करता येईल, असा अहवाल दिला होता. मात्र, मच्छे येथे









