मुंबई :
ऑक्टोबर महिन्यातील चांगल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर एस्कॉर्ट कुबोटा, फोर्स मोटर्स आणि डॉक्टर लालपाथ लॅब्ज यांचे समभाग शेअर बाजारात सोमवारी इंट्रा डे दरम्यानच्या सत्रात मोठ्या प्रमाणात तेजीत असलेले पाहायला मिळाले. ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत असणाया समभागांनी सोमवारी इंट्राडे दरम्यान बाजारात 5 टक्केपर्यंत वाढ नोंदवली होती. तसेच एस्कॉर्ट कुबोटा, फोर्स मोटर्स, डॉक्टर लालपाथ लॅब्ज, हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (हुडको)आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट यांचे समभाग दिवसाच्या सत्रात वाढलेले दिसून आले.









