ऑनलाईन टीम / तरुण भारत :
येरवडा येथील बालसुधारगृहातून कोयता गँगशी संबंधित 4 अल्पवयीन आरोपींनी पलायन केले आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये या आरोपींना अटक करण्यात आली होती.
येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बालसुधारगृहात या मुलांना ठेवण्यात आले होते. मंगळवारी येथील मुलांची आपापसात भांडणे झाली. याच गोंधळाचा आणि गर्दीचा फायदा घेत या चार अल्पवयीन आरोपींनी बालसुधारगृहाची खिडकी फोडून पलायन केले.
शहरातील विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलांना येरवडय़ाच्या बालसुधारगृहात ठेवले जाते. फेब्रुवारी महिन्यातही कोयता गँगच्या 7 सदस्यांनी या बालसुधारगृहातून पळ काढला होता.









