माडखोल बस थांब्यावरील घटना ; दुचाकींचे मोठे नुकसान
ओटवणे । प्रतिनिधी
आदमापूर जि.कोल्हापूर येथील बाळूमामा मंदिरातून दर्शन आटोपून सावंतवाडी -तळवडेच्या दिशेने येणाऱ्या इर्टिगा कारच्या चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना ठोकर दिल्याने दुचाकींचे नुकसान झाले . ही घटना रविवारी सकाळी ८. ३० ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली . दरम्यान ,माडखोल बस थांब्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून सातुळी – बावळाट येथील रहिवासी भास्कर परब आणि माडखोल येथील लक्ष्मण गावडे यांच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे . सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे .









