वृत्तसंस्था/ इंफाळ
11असे आहे. तो थौबल जिह्यातील तेंथा गावचा रहिवासी असून त्याच्यावर सहा लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दहशतवाद्याला त्याच जिह्यातील वांगबल मानिंग लीकाई येथून अटक करण्यात आली. 2021 मध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील तो मुख्य आरोपी आहे. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह पाच जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. सनातोंबाचे नाव राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वॉन्टेड यादीत समाविष्ट आहे. त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि दोन सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत.
नोव्हेंबर 2021 मध्ये भारत-म्यानमार सीमेवर मणिपूरच्या चुराचंदपूर जिह्यातील सेहकान गावाजवळ झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असल्यामुळे सनातोंबा एनआयएच्या वॉन्टेड यादीत होता. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंटच्या (एमएनपीएफ) कार्यकर्त्यांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यात 46 आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच सहा जण जखमी झाले. 6 जानेवारी 2022 रोजी एनआयएने सनातोंबाला अटक करण्यासाठी विश्वसनीय माहिती देणाऱ्या कोणालाही 6 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणात नाव असलेल्या 10 बंडखोरांपैकी तो एक होता.









