चेन्नई
इरिक्सन या दूरसंचार क्षेत्रातील स्वीडनमधील कंपनीने आपले 6 जी संशोधन आणि विकास केंद्र भारतात चेन्नईमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या संशोधनकार्यासाठी इरिक्सन कंपनी भारतातील आघाडीवरच्या अभियांत्रिकी संस्थांशी भागीदारी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशा प्रकारचे संशोधन केंद्र हे भारतात प्रथमच स्थापन होणारे तिसरे असल्याचे कंपनीने म्हटले असून पहिले केंद्र हे स्वीडनमध्ये दुसरे अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आले आहे.









