3 देशांकडून सायप्रसच्या सार्वभौमत्वाची घोषणा : मध्य आशियाच्या भूराजकारणात वादळ
वृत्तसंस्था/ अंकारा
तुर्कियेला मोठा झटका देत मध्य आशियातील प्रजासत्ताक देश तसेच कधीकाळी तुर्कियेच्या प्रभावक्षेत्रात (ओटीएस) राहिलेल्या तीन देशांनी सायप्रसच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले आहे. कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तानने सायप्रसच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याची घोषणा केली आहे. तुर्कियेसाठी हा मोठा झटका आहे कारण तो ओटीएसच्या माध्यमातून कब्जा असलेल्या उत्तर सायप्रसला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता. युरोपीय महासंघ-मध्य आशिया शिखर परिषदेदरम्यान तिन्ही मध्य आशियाई देशांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे प्रस्ताव 541 (1983) आणि 550 (1984) च्या समर्थनाची घोषणा केली आहे.
सायप्रस हा भूमध्य समुद्रातील एक बेटसदृश देश असून त्याला ब्रिटनकडून 1960 मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. या बेटावर मुख्यत्वे दोन समुदायांचे वास्तव्य आहे. ग्रीक सायप्रियॉट्स समुदायाची संख्या सुमारे 77 टक्के तर तुर्क सायप्रियॉट्स समुदायाची संख्या समारे 18 टक्के आहे. सायप्रस वाद मुख्यत्वे 1974 मध्ये सुरू झाला होता, तेव्हा ग्रीसच्या समर्थनाने सायप्रसमध्ये सैन्य सत्तापालटाचा प्रयत्न करण्यात आला होता, ज्यानंतर तुर्कियेने ‘तुर्क सायप्रियॉट्सच्या रक्षणा’च्या नावावर सायप्रसच्या उत्तर हिस्स्यावर हल्ला केला होता. यानंतर तुर्कियने सायप्रसच्या उत्तर हिस्स्याच्या सुमारे 37 टक्के भूभागावर कब्जा केला असून तेथे उत्तर सायप्रसच्या नावाने एका नव्या सत्तेची घोषणा केली आहे. परंतु उत्तर सायप्रसला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यास तुर्किये अपयशी ठरला आहे.
तुर्कियेला मोठा झटका
संयुक्त राष्ट्रसंघ उत्तर सायप्रसवरील तुर्कियेच्या कब्जाला अवैध मानतो. तर दक्षिण सायप्रस एक स्वतंत्र देश आहे. उत्तर आणि दक्षिण सायप्रसचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघाचा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 18 नोव्हेंबर 1983 रोजी ‘सायप्रस प्रजासत्ताकचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, क्षेत्रीय अखंडत्व आणि गटनिरपेक्षतेचा सन्मान करणे’ आणि सायप्रस प्रजासत्ताकच्या सरकारला वगळून बेटाच्या कुठल्याही अन्य सरकारला मान्यता न देण्याचे आवाहन केले होते.
तुर्किये मागील दोन वर्षांपासून उत्तर सायप्रसला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होता. परंतु या तीन देशांच्या घोषणेनंतर एर्दोगान यांच्या ‘पॅन तुर्कवाद’चा मार्ग संपुष्टात आला आहे. कजाकिस्तान आणि उझ्बेकिस्तान हे तुर्किये, अझरबैजान तसेच किर्गिस्तानसाब्sात तुर्किक देशांच्या संघटनेचे (ओटीएस) सदस्य आहेत. तर हंगेरी, तुर्कमेनिस्तान आणि सायप्रसच्या बिगरमान्यताप्राप्त उत्तर क्षेत्राला निरीक्षकाचा दर्जा प्राप्त आहे.
आशियातील भूराजकारणाला नवे वळण
मध्य आशियातील बहुतांश देशांसोबत तुर्कियेचे दृढ भाषिक, वांशिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. शतकांपासून हे देश ऑटोमन साम्राज्याचा हिस्सा होते. परंतु या तीन देशांच्या निर्णयामुळे तुर्कियेला मोठा झटका बसला आहे. तसेच एर्दोगान यांच्यासाठी हा व्यक्तिगत झटका असल्याचे मानले जात आहे.









