रेडी (प्रतिनिधी)-
मे. सोशीयेदाद दि फोमेंतो इंडस्ट्रीयल प्रायव्हेट लि.गोवा यांच्या प्रस्तावित माऊली लोह खनिज ब्लाँक रेडी (कनयाळ) येथील खाण लिज क्षेत्र 24.26 हेक्टर 0.3 दशलक्ष प्रतिवर्ष क्षमतेच्या लोहखनिज उत्खननाबाबत प्रस्तावित प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी मंगळवार दि.19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री देवी माऊली पाणी पुरवठा योजना रेडी हुडावाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.या जनसुनावणीत पर्यावरण विषयक सूचना, विचार ,टिका टिप्पणी तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी ही जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









