कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
वर्कऑर्डरप्रमाणे एखाद्या ठिकाणाची ज्यावेळी आपण वृक्षतोड करतो त्यावेळी एका तोडलेल्या झाडाच्या बदलीत पाच झाडे लावण्याचा सरकारी नियम असताना कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ठेकेदाराने झाडे का लावली नाहीत आणि जर लावली असतील तर त्या झाडांचा तपशील वनविभागाकडे का तपशील नाही आहे. एकीकडे शासन होतोय पण दुसरीकडे पर्यावरणास हानी पोहचत आहे विकासाच्या नावाखाली ही सरळ सरळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे असा सवाल वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेने केला आहे.
गेल्या अडीच वर्षापासून कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचे ऊंदिकरण व मजबूतीकरणाचे काम सुरू आहे. सध्या कोल्हापूर ते कळे या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील काम कळे या गावापासून सूरू होणार आहे. यासाठी कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्याच्या दुतर्फा असणारी हजारो झाडाची कत्तल केली गेली आहे. यामध्ये सूमारे 100 ते 150 वर्षाची जूनी डेरेदार हे]िरटेज झाडे तोडून सर्व निसर्गवैभव नष्ट केले आहे. याचा परिणाम स्थानिक पशू, पक्षी त्यांचा अधिवास नष्ट होण्यास व पर्यावरण जैवविविधता व हवामानावर होत आहे. या धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात संपूर्ण परिसंस्थाच संकटात येउ शकते.
या रस्त्याच्या कामाच्या वर्कऑर्डरनूसार मे. व्ही. पी कनस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी संबधित कामासाठी जी झाडे तोडली आहेत. त्याबदल्यात त्यांनी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेला दिलेल्या खुलासा पत्रात कोल्हापूर कळे या राष्ट्रीय महामार्ग 166 जी या मार्गावर जांभूळ, आंबा, करंज, वड, पिंपळ, शिसम, खैर अशा प्रकारच्या तीन हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. परंतू या वृक्ष लागवडीचे ठिकाण जीपीएस, लोकेशन, फोटो, क्षेत्रफळ, वृक्ष लागवड केलेल्या जागेची मालकी यातील कोणतेही सविस्तर माहिती राष्ट़ीय महामार्ग उपविभाग यांना वारंवार अर्ज करूनही दिलेली नाही. असा दावा वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेने केला आहे.
- या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी
संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानूसार कोल्हापूर जिह्यातील बहूतांश ठिकाणी संबधित ठेकेदारांनी झाडेच लावलेली नाहीत. तसाच प्रकार कोल्हापूर कळे या ठिकाणी झाला असण्याची दाट शक्यता आहे. असा संस्थेने दावा केला आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये व तोडलेल्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडून वर्कऑर्डर मध्ये नमूद केल्याप्रमाणे योग्य त्या प्रमाणात व संख्येत स्थानिक देशी झाडे लावण्यात यावी यासाठी या प्रकरणाची गांभीर्याने दखल प्रशासनाकडून घेतली जावी अशी अपेक्षा वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेने केली आहे.
अभिजित वाघमोडे, अध्यक्ष वर्ल्ड फॉर नेचर संस्था
- वनविभागाने द्यावेत आदेश
वनविभागने पावसाळ्याच्या तोंडावर संबंधित यंत्रेणेला योग्य त्या संख्येत स्थानिक देशी झाडे लावण्यासाठी सक्त लेखी आदेश द्यावेत. कारण आम्हाला प्रत्यक्ष रस्त्यांच्य दुतर्फा कोणतीही झाडे लावलेली दिसली नाहीत.
शूभम पाटील, नागरिक बालिंगा
- ठेकेदाराला नेमक कोण पाठीशी घालतय
सरकारी यंत्रणाकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा का प्रयत्न होत आहे. मूळात या ठेकेदाराला एनएचएआय पाठीशी घालतय की काय असा प्रश्न वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे पदाधिकारी करत आहेत. जर वनविभागाच्या नोटीशीला पण ठेकेदार केराची टोपली दाखवत असेल तर त्याला नेमका कोणाचा वरदहस्त आहे याची प्रशानाने त्यांच्या पातळीवर दखल घेऊन कारवाई करावी अशीही मागणी या संस्थेच्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.








