केआयटीच्या ओम मंत्री आणि विजय मधाळे या विद्यार्थ्यांचे संशोधन
मिक्स कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करून इतर कचऱ्याचे विघटन करण्यास मदत
कोल्हापूर/अहिल्या परकाळे
महापालिकेच्या वतीने सुका आणि ओला कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. परंतू सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक मिक्स असते. हे प्लास्टिक बाजूला करून इतर कचऱ्याचे विघटन करण्यासाठी केआयटीच्या विद्यार्थ्यांनी ‘अॅटोमॅटिक प्लास्टिक सेग्रीगेशन मशीन’ तयार केले आहे. या मशीनच्या सहाय्याने प्लास्टिकवर केमिकल फवारून प्लास्टिक कचऱ्यापासून वेगळे तयार करता येते. जणेकरून प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि पर्यावरण संवर्धन करण्यास मदत होईल. ऐवढेच नाही तर प्लास्टिकमुळे मानवाला होणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळेल.
प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी केआयटीच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्यातील प्लास्टिक विघटनासाठी एक मॉडेल तयार केले आहे. पहिल्या टप्यात कचऱ्यावरा आयर्ण पावडर व केमिकलचा फवारा मारल्याने ही पावडर प्लास्टिकवर चिकटते. दुसऱ्या टप्यात मॅग्नेट आयर्ण पावडर चिकटलेले प्लास्टिक वेगळे होने. तिसऱ्या टप्प्यात चिकट आयर्ण पावडर असल्याने प्लास्टिकचे चुंबकीय आकर्षण होवून प्लास्टिक मिक्स कचऱ्यापासून वेगळे करून त्यावर प्रक्रिया करता येते. चौथ्या टप्प्यात कन्व्हेयर बेल्टवर एक इलेक्ट्रोमॅग्नेट लास्टिक वेगळे करून दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवते. अशी चार टप्प्यात ही मशीन काम करेल. ‘अॅटोमॅटिक प्लास्टिक सेग्रीगेशन मशीन’ तयार करण्यासाठी सॉफ्ट आयर्न, इन्सुलेटेड कॉपर, वायर आणि बॅटरीचा उपयोग केला आहे. जेणेकरून मिक्स कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे करून त्यावर प्रक्रिया करून नष्ट करता येते. प्लास्टिक वेगळे केल्याने कचऱ्यातील इतर टाकावू कचऱ्याचे विघटन होवून त्याचा पुनर्वापर करता येतो. कचऱ्या व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्लास्टिकमुळे अनेक अजार होतात. या प्रकल्पामुळे मनुष्य प्लास्टिकच्या अपायापासून दूर राहिल व कचरा वर्गीकरणही होईल.
शासनाच्या धोरणाला पूरक संशोधन
प्लास्टिक कचऱ्यामुळे जमिनीचा कसदारपणा कमी होत असून पाणी प्रदुषणात वाढ होते. तसेच उघड्यावर पडलेला कचरा भटक्या जनावरांच्या पोटात गेला तर त्यांच्या जीवाला धोका असतो. हवेचे प्रदूषण वाढले असून पर्यावरणास घातक ठरते आहे. प्लास्टिकचे वर्गीकरण करून विल्हेवाट करण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. या धोरणाला पूरक संशोधन केआयटीच्या ओम मंत्री आणि विजय मधाळे या दोन विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यांनी या संशोधनाचे सादरीकरण मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अन्वेशना 2023 सायन्स व इंजिनिअरिंग फेअर’साठी केले होते. या स्पर्धेत या संशोधनाला राज्यात चौथा क्रमांक मिळाला आहे. या संशोधनाचा वापर राज्यातील सर्वच महापालिकेतील कचरा व्यवस्थापनात करण्याचा संशोधकांचा मानस आहे.
उद्योजकांनी या संशोधनाला बळ देण्याची गरज
केआयटीमधील ओम आणि विजय यांचे संशोधन अतिशय उत्तम असल्याची प्रतिक्रिया शिक्षणासह सर्वच क्षेत्रातून येत आहे. केआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला प्रोजेक्ट एक प्रकारे स्टार्टअप आहे. त्यामुळे राज्य शासन आणि उद्योजकांनी या प्रोजेक्टला आर्थिक मदत करण्याची गरज आहे. जेणेकरून शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना संशोधन करून स्टार्टअप करण्याचे आवाहन केले आहे. त्याला बळ मिळेल आणि आम्हाला रोजगार मिळेल, अशी प्रतिक्रिया ओम आणि विजयने दिली आहे.
मशीन तयार करण्यासाठी कशाचा वापर केला
स्वयंचलित प्लॉस्टिक पृथक्करण मशीन तयार करण्यासाठी इमेज प्रोसेसिंग सेन्सर्स, कन्व्हेयर, मॅग्नेटिक तत्व, नोजल स्प्रेअर यांचा समावेश केला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ओम आणि विजयने प्रा. अमित वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रोजेक्ट तयार केले आहे.









