कट्टा / वार्ताहर
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य प्रशिक्षण कार्यशाळा,थोर समाजसेवक, पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.संपूर्ण राज्यभरातील एकुण 36 जिल्ह्यातील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र चे जिल्हा अध्यक्ष, सचिव व इतर सर्व पदाधिकारी यांची प्रबोधनात्मक व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.पद्मश्री डॉ विकास महात्मे (माजी खासदार व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रचिकित्सक),मा.श्री अशोक काकडे (व्यवस्थापकीय संचालक,सारथी),मा डॉ सुधा कांकरिया,मा.श्रीमती सुवर्णाताई माने, उपवनसंरक्षक अहमदनगर,मा श्री दिनकर टेमकर (माजी शिक्षण संचालक, प्राथमिक ),मा श्री राज देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. मा अशोक काकडे पर्यावरणासाठी झाडे लावताना एक विद्यार्थी एक झाड अशी संकल्पना राबवा. त्याचबरोबर Beat plastic pollution.असे उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी घ्या. असे मत यावेळी व्यक्त केले.
मा डॉ विकास महात्मे यांनी आपले विचार मांडताना प्रत्येक पर्यावरणातील गरजेनुसार झाडे लावा.असे उपक्रम राबवा जे recycle होतीस व त्यामधून उत्पन्न मिळेल.जेणेकरुन शासनदेखील त्या योजना राबविण्याचा विचार करेल.आदरणीय थोर समाजसेवक पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांनी आपली तब्येत साथ देत नसल्याने तुमच्याशी जास्त वेळ मार्गदर्शन करता येणार नाही असे म्हणत पर्यावरण सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र जिल्हा सिंधुदुर्ग चे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश कानूरकर व महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री लक्ष्मण पावसकर यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला.व सर्व पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.राळेगणसिद्धी आंदोलन संग्रहालयातील डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या आंदोलनाच्या इतिहास व त्यांनी केलेली आंदोलने पाहुन प्रत्येक कार्यकारिणी सदस्यांना खुप मोठी प्रेरणा मिळाली.व प्रत्येक सदस्याने पर्यावरण आणि प्रदुषण निवारण करण्याची प्रतिज्ञा केली.यावर निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र जिल्हा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री प्रकाश कानूरकर यांनी प्रतिक्रिया देताना समाजातील प्रत्येक मनूष्याने एकदा तरी राळेगणसिद्धीला अवश्य भेट द्यावी.आदरणीय डॉ अण्णासाहेब हजारे यांचा इतिहास पहावा. असे मत व्यक्त केले.









