प्रतिनिधी /बेळगाव
संजीवनी फौंडेशनच्या वृद्धाश्रमात श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करून पाच दिवस विधिवत पूजा करण्यात आली. ही मूर्ती शांताई वृद्धाश्रमातून आणण्यात आली होती, जी पर्यावरणपूरक होती. मूर्तीला साजेशी आरासही पर्यावरणपूरक अशीच होती.
पाचव्या दिवशी संजीवनी फौंडेशनच्या आवारात तयार केलेल्या जलकुंडामध्ये अजित देगीनहाळ यांच्या हस्ते श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ही माती आवारातील झाडांना घालण्यात आली. फौंडेशनच्या सविता देगीनहाळ यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.









