समुहामध्ये आत जाण्याची नाही अनुमती
विदेशात बार हा मित्रांसोबत वेळ घालविण्याचे ठिकाण असते. बारमध्ये कुणी एकटा बसून ड्रिंक एंजॉय करत असल्याचे फारच कमीवेळा दिसून येत असते. बारमालक देखील लोकांनी समुहात यावे इच्छित असतो, परंतु जपानचा एक बार याप्रकरणी अत्यंत वेगळा आहे. या बारमध्ये ग्रूप एंट्रीवर पूर्णपणे बंदी असून येथे एकटा येणाराच आत शिरू शकतो.
टोकियोच्या शिंजूकुमध्ये एक बार असून त्याचे नाव हिटोरी आहे. हा बार अन्य बारसारखाच असला तरीही याचे एक वैशिष्टय़ अत्यंत विचित्र आहे. या बारमध्ये लोकांना ग्रूपमध्ये प्रवेश मिळत नाही. म्हणजेच तुम्ही येथे मित्र-मैत्रिणींसोबत जाऊ शकत नाही. केवळ एकटय़ालाच या बारमध्ये जात मद्यपान करता येते.

हिटोरीचे नियम अजब असले तरीही यामागे विशेष हेतू आहे. येथे लोक येतात एकटे, परंतु आत एकटेच राहत नाहीत. बारमध्ये लोक परस्परांशी मोठय़ा प्रमाणात संभाषण करतात. लोकांनी येथे येत अनोळखी लोकांशी संवाद साधावा, नव्या लोकांबद्दल जाणून घ्यावे म्हणून बारने हा नियम तयार केला आहे. येथे अनेक लोक परस्परांशी इतके घनिष्ठ होतात की त्यांची मैत्री बारबाहेर देखील बहरत असते.
अन्य कुठला बारमध्ये जर एखादा पुरुष कुठल्याही महिलेशी बोलू लागल्यास तो फ्लर्ट करतोय असे वाटू लागते, परंतु या बारमध्ये कुणीच कुणाबद्दल मत तयार करत नाही. युवक-युवती परस्परांशी मनमोकळणेपणाने बोलत असतात. 2018 मध्ये सुरू झालेला हा बार आता अत्यंत लोकप्रिय ठिकाण ठरला आहे.









