बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे चर्चेत आहे. ईडीने तिच्या विरोधात आरोप निश्चित केले आहेत. याचदरम्यान मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव गुंतल्यावर अभिनेत्रीचा सुकेशसोबत बेकअप झाला आहे. सुकेशपासून वेगळे झाल्यावर अभिनेत्रीच्या आयुष्यात आता एका विदेशी अभिनेत्याची एंट्री झाली आहे.

जॅकलीन सध्या 365 डेजचा अभिनेता मिशेल मोरोनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे समजते. या दोघांच्या नात्याबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जॅकलीन आणि मिशेल मोरोना यांची भेट नेहा कक्कड तसेच टोनी कक्कडचे गाणे ‘मुड मुड के’च्या सेटवर झाली होती. या भेटीनंतर दोघांनी परस्परांना डेट करण्यास सुरुवात केली आहे. मूड मूड के गाण्यात जॅकलीन आणि मोरोना यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला मोठी पसंती मिळाली होती.
जॅकलीन लवकरच अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. हा चित्रपट दिवाळीवेळी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सर्कस’मध्ये अभिनेता रणवीर सिंह ची नायिका म्हणून ती काम करत आहे. जॅकलीन यापूर्वी ‘विक्रांत रोना’ या चित्रपटात दिसून आली होती. यात तिने किच्चा सुदीपसोबत मुख्य भूमिका साकारली होती.









