प्लास्टिव्हीजन इंडियाचे अध्यक्ष सत्यजित भोंसले यांचे गोव्यातील उद्योजकांना आवाहन : 7 डिसेंबरपासून मुंबईत आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया 2023 प्रदर्शन
पणजी : बदलत्या काळाची गरज ओळखून आंतरराष्ट्रीय प्लास्टिव्हिजन इंडिया प्रदर्शनातून नवनवीन रोजगार आणि उद्योगाच्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. गोव्यालाही त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने 7 ते 11 डिसेंबर या काळात मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया 2023 या प्रदर्शनाला गोव्यातील 80 ते 82 उद्योजकांनी सहभागी व्हावे. या प्रदर्शनात अत्याधुनिक मशिनरी व इतर गोष्टी बारकाईने जवळून अनुभवता येणार आहेत. या प्रदर्शनात कच्चा माल तयार करणाऱ्या गोव्यातील उद्योजकांनीही सहभागी व्हावे, यासाठी उद्योजक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती प्लास्टीव्हीजन इंडियाचे अध्यक्ष सत्यजित भोंसले यांनी दिली. मिरमार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्लास्टीव्हीजन इंडियाचे सहअध्यक्ष आशुतोष गोर, चंद्रकांत तुरखीया, महाराष्ट्र प्लास्टिक आएसआयचे प्रमोशन करणारे रवी जसलानी उपस्थित होते. द ऑल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्यावतीने मुंबई गोरेगाव येथील बॉम्बे बिझनेस सेंटर येथे प्लास्टिक व्हिजन इंडिया 2023 हे बारावी प्रदर्शन भरत आहे येत्या दिनांक 7 ते 11 डिसेंबर दरम्यान संपन्न होण्राया या प्रदर्शनाच्या माहितीसाठी गोवा राज्यातील प्लास्टिक उद्योजकांच्या उद्योजकांचा व कच्चा माल तयार करणाऱ्यांसाठी स्नेह मेळावा काल (बुधवारी) मिरामार येथे झाला.
सत्यजित भोसले यांनी सांगितले की, या आंतरराष्ट्रीय प्रदर्शानात 30हून अधिक परदेशातील प्रतिनिधींसह देशभरातील किमान अडीच लाख व्यवसायिक – नागरिक या प्रदर्शनास भेट देणार आहेत. जगातील हे पाचव्या क्रमांकाचे प्रदर्शन आहे. गोवा हे देशातील छोटेसे राज्य असले तरी पर्यटनदृष्ट्या महत्त्व असून, या ठिकाणच्या उद्योजकांनाही त्याचा लाभ व्हावा, यासाठीच हा मेळावा घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. प्लास्टीव्हीजन प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे अनावरण प्लास्टीव्हीजन इंडियाचे सहअध्यक्ष आशुतोष गोर यांनी केले. या प्रदर्शनाची सविस्तर माहिती प्लॅस्टिव्हिजनचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे गोर यांनी दिली. प्लॅस्टिक विश्वाच्या विविध पैलूंनी उद्योग विकास वाढीसाठी या पॉस्टीव्हीजन इंडिया – 2023 विविध दालने या असणार आहेत. यामध्ये मुख्यत्वाने वैद्यकीय औद्योगिक क्षेत्रात संशोधनाचा प्लास्टिकचा वापर – प्लास्टिकची शेती अवजारे आणि त्याचा वापर – टाकाऊतून टिकाऊ प्लास्टिक आणि या क्षेत्रातील संशोधन योजना अशी विभाग या प्रदर्शनात असणार असून त्याचा युवा वर्ग, संशोधक, व्यावसायिकांसह सर्वांना लाभ होणार आहे. हे प्रदर्शन केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया सहउद्योग आंतरराष्ट्रीय खाती – स्टार्ट अप इंडिया आदी विविध विभागाशी संलग्न आहे त्यामुळे ती सर्व यंत्रणाही या प्रदर्शनाला पूरकपणे काम करत आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून हिरवा कंदील
मुंबई येथे होणारे आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया हे प्रदर्शन गोव्यासाठी लाभदायी ठरणार आहे. कारण गोव्यात साधारणत: 80 ते 82 टाकाऊ प्लास्टिकपासून कच्चा माल तयार करणारे उद्योजक आहेत. त्यांना आपल्या व्यवसायात नाविन्यता आणण्यासाठी मुंबईतील प्रदर्शनाचा लाभ होणार असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रदर्शनाला गोव्यातील उद्योजकांनी उपस्थित राहून गोव्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी सरकारला मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.
साळगाव येथील प्रकल्पालाही आयोजकांची भेट
मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्लास्टीव्हीजन इंडिया प्रदर्शनाचे प्रमुख तथा लास्टीव्हीजन इंडियाचे अध्यक्ष सत्यजित भोंसले, प्लास्टीव्हीजन इंडियाचे सहअध्यक्ष आशुतोष गोर, चंद्रकांत तुरखीया, महाराष्ट्र प्लास्टिक आएसआयचे प्रमोशन करणारे रवी जसलानी आदींनी साळगाव येथील प्रकल्पाला भेट देऊन येथील प्लास्टिक कचऱ्याच्या वापर पुनर्वापर करण्यासाठी निश्चितच सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.









