ओटवणे प्रतिनिधी
आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात ३२ साव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायणाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी भाजपा नेते युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आला.
सात दिवसाच्या पारायणात दररोज सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी ८ वाजल्यापासून ज्ञानेश्वरी वाचन, संध्याकाळी ४ वाजता प्रवचन, संध्याकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ८ ते १० कीर्तन, रात्री १० वाजल्यापासून धनगरी नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामस्थांची भजने, गावातील महिलांसाठी महाआरती (दीपज्योती), काल्याचे कीर्तन, महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.यावेळी विशाल परब यांचे बंधू विकास परब, आंबेगाव देवस्थान समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परब, कार्यक्रम समिती अध्यक्ष दीपक गावडे उपाध्यक्ष जयानंद लक्ष्मण परब, सचिव जनार्दन बाबू जंगले, सहसचिव अण्णा केळुसकर, खजिनदार योगेश बाळकृष्ण गवळी, आंबेगाव देवस्थान पंच व मानकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.









