बेळगाव : बेळगावमध्ये प्रथमच श्वान आणि त्यांचे पालनकर्ते यांच्यासाठी ‘वॉक विथ वॅग’ वॉकेथॉन पार पडले. ‘द पॉवशाला’च्यावतीने संस्थापक अरुणा नायकवाड यांनी या वॉकेथॉनचे आयोजन केले होते. यामध्ये श्वान आणि त्यांचे पालनकर्ते उत्साहाने सहभागी झाले. कन्नड साहित्य भवनच्या आवारामध्ये झालेल्या या कार्यक्रमात कुत्र्यांसमवेत कसे चालावे, त्यांचे वर्तन कसे ओळखावे, त्यांना कसे प्रशिक्षण द्यावे याबद्दल माहिती देण्यात आली. या वॉकेथॉनला श्वानप्रेमींनी आणि श्वान पालनकर्त्यांनी लक्षणीय प्रतिसाद दिला. श्वान आणि त्यांचे मालक यांच्यामध्ये आपुलकीचे बंध निर्माण व्हावेत, या हेतूने झालेल्या या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









