मालवण / प्रतिनिधी
कोळंब मंडळ अधिकारी स्तरावर कोळंब ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महसूल सप्ताह निमित्ताने एक हात मदतीचा कार्यक्रम मंडळ अधिकारी मिनल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी महसूल संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले, यावर मंडळ अधिकारी यांनी ग्रामस्थांया समस्या सोडविण्यासाठी शासन आता ग्रामस्थांपर्यंत पोहचलेले आहे, ग्रामस्थांनी कायदेशीरपणे आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन केले. यावेळी सलोखा योजना, सातबारा नोंदी, वारस तपास, ई पिकपाणी, संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेची माहिती तसेच इतर महसूल विभागांया अखत्यारीत येणाऱ्या सर्वच विषयांवर मंडळ अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, विशाल फणसेकर, तलाठी उषादेवी पाटील, प्रमोद कांडरकर, प्रसाद बांदेकर, बापू बावकर, सुनील फाटक, सौ. दिपलक्ष्मी मेथर, रमण कदम, प्रदिप चव्हाण, स्वप्नील साटम, नितीन डिचवलकर, अनघा कदम, विशाखा कदम, गणेश कदम, विश्वनाथ कदम, दामोदर घाडी, सुनील घाडी, हिमांशु कदम, पवार, शिलीनी पवार, अनील कुर्ले, एकता ढोलम, निकीता भोजने, नमीता नरे, हिमानी लाड, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.









