उद्यापासून दोन दिवस मडगावात आयोजन
पणजी : सर्वसामान्यांपासून थेट राजघराण्यांतील लोकांसाठी दागिने तयार करण्याचा तब्बल 155 वर्षांचा वारसा असलेल्या सी. क्रिशनैया चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सतर्फे पणजीत आयोजित करण्यात आलेल्या अतुलनीय कारागिरी आणि डिझाइनच्या दागिन्यांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानीतील फिडाल्गो हॉटेल येथे आयोजित या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. उद्घाटन सोहळ्यास आमदार डिलायला लोबो आणि अॅक्टर तथा मॉडेल समिक्षा करमलकर हरजी यांची खास उपस्थिती होती. हेच प्रदर्शन उद्या दि. 1 आणि 2 नोव्हेंबर असे दोन दिवस मडगावात हॉटेल नानूटेल येथे आयोजित करण्यात येणार आहे.
पारंपारिक आणि आधुनिक डिझाईन्सचे अनोखे मिश्रण असलेले हे दागिने शुद्ध सोने आणि रत्ने आणि उत्कृष्ट कारागिरीने बनवलेले आहेत. त्यात हस्तशिल्प दागिन्यांचा खरा उत्कृष्ट नमुना जो वाडियार राजघराण्याचे अधिकृत शाही निवासस्थान तसेच म्हैसूरचा समृद्ध इतिहास आणि ऐश्वर्यातून प्रेरणा घेतो. त्यातून दृष्टी, नाविन्यता, डिझाइन आणि गुणवत्तेचा मिलाफ दिसून येतो. त्यांच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये नीलमणी, सिट्रीन, मोती, ऍमेथिस्ट आणि माणिक यांसारख्या दुर्मिळ रत्नांसह उत्कृष्ट हिऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे लालित्य आणि तेज उत्तेजित होते. दरम्यान, पारंपारिक आणि समकालीन निर्मितीच्या संग्रहाच्या विशिष्ट श्रेणीतील अपवादात्मक दागिन्यांसह लोकांसाठी खुल्या असलेल्या या प्रदर्शन विक्रीवेळी विशेष सण ऑफर म्हणून सोन्यावर 4 टक्के, हिऱ्यावर 6 टक्के आणि 18.69 लाख किंमतीच्या हिऱ्यावर 9 टक्के अशी सूट देण्यात येणार आहे. ही ऑफर 2 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहे.









