प्रतिनिधी, रत्नागिरी
महाराष्ट्र शासन उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व रायगड जिल्हा आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी स्टेडीअम येथे फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत विविध वयोगटात व विविध अंतरासाठी 2000 नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.सकाळी 5.45 वा.च्या सुमारास 21 कि.मी.स्पर्धेस पालकमंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखवून मेरॉथॉनचा शुभारंभ केला.
फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टीशर्ट आणि बोब नंबर जिल्हा क्रीडा कार्यालयतून वितरित करण्यात आले होते.स्पर्धेसाठी सर्व धावपटूंनी सकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी स्टेडिअम रत्नागिरी येथे उपस्थित होते.स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम, रत्नागिरी येथून प्रारंभ झाला.सकाळी 5 वाजता खेळाडूंच्या वॉर्मअपसाठी झुंबा डांसचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर पुढील सर्व स्पर्धा 20 मिनिटांच्या अंतराने सुरु करण्यात आली 21 कि.मी.स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम रत्नागिरी येथून प्रारंभ होऊन जयस्तंभ मार्गे पावस रोड येथील मुकूल माधव शाळेजवळून परत फिरुन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम येथे पूर्ण करण्यात आली. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गटातील तीन याप्रमाणे म्हणजे 36 विजेत्यांना रोख रक्कम,पदकं आणि प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









