प्रतिनिधी
बांदा
बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडऴ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.मंडळ कार्यकर्ते,व्यापारी,युवक तसेच महिलांनी सहभागी होत मोठ्या संख्येने रक्तदान केले.सावंतवाडी आणि ओरोस येथिल रक्तपेढ्यांच्या टिमने रक्त संकलनाचे काम केले.
बांदा व्यापारी भुवन येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.यावेळी निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस, सिंधु रक्तमित्र सल्लागार तथा जागरुक रक्तदाता सुधिर पराडकर,बांदा सरपंच प्रियांका नाईक ,उपसरपंच जावेद खतिब,माजी जि.प.सदस्य श्वेता कोरगांवकर मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार,उपाध्यक्ष आबा धारगळकर,सचिव दादा पावसकर,खजिनदार विठ्ठल वाळके आदी मान्यवर व्यासपीठावऱ उपस्थित होते.
यावेळी 77 वेळा रक्तदान केलेले सुधिर पराडकर, आपल्या जन्मदिनी रक्तदान केलेल्या श्वेता कोरगावकर व पोलिस खात्यात उत्कष्ट सेवा बजावलेले निवृत्तीनंतर सामाजाकार्यात सक्रिय असलेले दयानंद गवस यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बांद्यातील कौटुंबिक आपत्ती कोसळलेल्या तसेच आजारी व्यक्तींना मंडळातर्फे मदतीचा हात देण्यात आला.
या रक्तदान शिबिरासाठी ओरोस रक्त पेढीचे डॉ.ऋषिकेश गच्चे,सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ.ज्ञानेश्वर भुजबळ ,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर तसेच बाबली गवंडे, मिनल सावंत,संजय पिळणकर,सिद्घार्थ पराडकर,सुधिर पराडकर,निलेश मोरजकर यांचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांच्या अल्पोपहाराची सोय रोटरी व रोटरँक्ट क्लब तर्फे करण्यात आली होती.जि.प.माजी सभापती तथा रोटरी अध्यक्ष प्रमोद कामत,प्रसिद्ध व्यापारी भाऊ वळंजु यांचेसह अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. मान्यवरांचे स्वागत मंदार कल्याणकर,साई काणेकर,ओंकार नाडकर्णी,निलेश कदम,सर्वेश गोवेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली शिरसाट यांनी ,प्रास्ताविक श्रीप्रसाद वाळके यांनी तर आभारप्रदर्शन अक्षय मयेकर यांनी केले.









