Enthusiastic response to blood donation camp at Sonurli
पाक्याचीवाडी ग्रामस्थ आणि मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर 2 येते घेण्यात आले या शिबिरास रक्ता त्याने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले व त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले या शिबिरास युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देवा सूर्याजी तसेच रक्तपेढी विभाग उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी डॉक्टर सागर जाधव आणि त्यांचे सहकारी प्राजक्ता रेडकर मानसी बागेवाढ अनिल खाडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले .या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून सोनुर्ली ग्रामपंचायत सरपंच श्री नारायण हिराप सदस्य दामोदर पालेकर संजना धुरी सोनुर्ली पोलीस पाटील अजित वैज निरवडे ग्रामपंचायत माजी सरपंच श्री हरी वारंग, संदीप बाईत , माजी शिक्षक श्रीकृष्ण भगत , सोनुर्ली शाळा नंबर दोन मुख्याध्यापक दशरथ नाईक ग्रामस्थ चंद्रकांत मठकर, अर्जुन साळगावकर ,आनंद देवकर, संतोष नाईक , विनोद ठाकुर आणि इतर मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन सोनुर्ली पाक्याचीवाडी ग्रामस्थ आणि मित्र कार्यकर्त्यांनी केले.
न्हावेली / वार्ताहर









