वार्ताहर /रेवोडा
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोवा यांच्या तर्फे, आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने गावागावांत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतो, याचाच भाग म्हणून रेवोडा पंचायतीच्या सभागृहात आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे दिडशेहून जास्त लोकांनी याचा फायदा घेतला.सुऊवातीस रेवोडा पंचायतीच्या सरपंच सौ. कांचन गांवकर यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पंचायत सदस्य स्मितेश कवठणकर, सदा रेवोडकर, विजयता फडते, वैद्यकीय शिबिर प्रमुख डॉ. प्रशांत ससाणे, डॉ. अखिलेश शुक्ला, डॉ.रेश्मी बिजी, डॉ.पलव, आदी उपस्थित होते. डॉ. प्रशांत ससाणे यांनी यावेळी उपस्थित ऊग्णांना मार्गदर्शन करताना भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व सांगताना कोणतेही रोग पथ्य व आयुर्वेदाचे नियम पाळून मुळापासून नष्ट करता येतात असे सांगितले. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने धारगळ येथे बांधलेल्या इस्पितळाचा लोकांनी फायदा घ्यावा. इस्पितळाच्या डिन प्रो. सुजाता कदम व इतर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने ऊग्णांना चांगली सेवा मिळत आहे असेही यावेळी डॉ. ससाणे म्हणाले. स्टाफ नर्स विनिता, फार्मसिस्ट अमन शर्मा यांनी सहकार्य केले, सरपंच सौ. कांचन गांवकर यांनी स्वागत केले, पंच सदस्या विजयता फडते आभार मानले.









