बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कंग्राळी बुद्रुक आणि कंग्राळी खुर्द गावात प्रचार केला.
गावातील प्रमुख गल्ल्यांमध्ये रोड शो द्वारे मतदारांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रचारपदयात्रेद्वारेला सुरुवात झाली.गेल्या वेळेस सांगितल्या प्रमाणे माझ्या क्षेत्रातील कामे मी पूर्ण केली आहेत. या ५ वर्षात येथील रस्त्यांचे विकास करण्यात आले आहे. गेत ५ वर्षात आपले सहयोग लाभले असून मी मतदार म्हणून नाही तर आपल्या परिवारातील एक सदस्य म्हणून हक्काने मताची मागणी करीत आहे.
राजहंसगडावर राजा शिवछत्रपतींची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित कारण्याच्ये ध्येय पूर्ण केले असून राजहंसगड कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पर्यटनस्थळ बनले आहे. त्यावेळी उद्घटना वेळी राजकीय रंग चढविण्यात आला होता, परंतु आपण मला साथ दिली.
यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत मला देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि पुन्हा ग्रामीण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला संधी द्या अशी विनंती केली.










