बेळगाव : गुरुवारी निघालेल्या दौडमध्ये हजारो युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाल्याने दौडमध्ये उत्साह निर्माण झाला होता. नेहरूनगर येथील बसवाण्णा मंदिरमध्ये आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे एपीएमसीचे पीएसआय मंजुनाथ बजंत्री यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी सदाशिवनगर येथून दौडची सुरुवात झाली. यानंतर नेहरूनगर, कोल्हापूर सर्कल, गँगवाडी, व•रवाडी, अशोकनगरमार्गे जोतिबा मंदिरपर्यंत जाऊन तेथे दौडचा समारोप झाला. जोतिबा देवस्थान समितीच्यावतीने दौडचे स्वागत करण्यात आले. आरती आणि ध्येयमंत्र झाल्यानंतर मार्केट पोलीस स्थानकाचे सीपीआय यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. दौड येण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी कमानी सजविण्यात आल्या होत्या. रस्त्यांवर मोठमोठ्या रांगोळ्या रेखाटून रंग भरण्यात आले होते. फुलांच्या रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या होत्या. जोतिबा देवस्थानच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.
शुक्रवार दि. 20 रोजीचा दौडीचा मार्ग
श्री दुर्गामाता मंदिर खासबाग येथून दौडला प्रारंभ होणार आहे. भारतनगर क्रॉस नं. 1, नाथ पै सर्कल, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, मरगाम्मा मंदिर, भारतनगर पाचवा क्रॉस, चौथा क्रॉस, रयत गल्ली, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेन रोड, बाजार गल्ली, मारुती मंदिर, तेग्गीन गल्ली, जुने बेळगाव रोड, गणेशपेठ गल्ली, कुलकर्णी गल्ली, कोरवी गल्ली, संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, लक्ष्मी गल्ली, बस्ती गल्ली, खन्नुरकर गल्ली, चावडी गल्ली, रामदेव गल्ली, येळ्ळूर रोड, नाझर कॅम्प क्रॉस नं. 3, हरिजनवाडा, हरिमंदिर, विठ्ठल मंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, पाटील गल्ली, धर्मवीर संभाजीनगर, पाटील गल्लीतील मंगाई मंदिर येथे सांगता.









