आळते प्रतिनिधी
बिरदेववाडी (ता. हातकणंगले) पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ सेवाभावी तरुण मंडळे व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून श्रीमंत दगडूशेठ गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केला असुन मंदिरामध्ये श्रीं च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा १ मे ते ३ मे पर्यंत धार्मिक उत्साही वातावरणात संपन्न झाला .
सोमवार दिनांक १ मे रोजी मूर्तीची रथामधून सवाद्य मिरवणूक व मूर्तीचा धान्य दिवस सोहळा पार पडला .मंगळवार २ मे रोजी संकल्प , गणेश पूजन , पुण्याहवाचन , नांदीश्राद्ध ,आचार्यवरण नवग्रह स्थापना , वास्तू देवता , ब्रह्मादी देवता , देवता हवन , गणेशयाग आदी विधी संपन्न झाले . बुधवार दि . ३ मे रोजी सद्गुरु श्री हेरवाडकर मामा रुकडी यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा करण्यात आला .तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अवधूत महादेव देवकाते यांच्या हस्ते झाली . संपूर्ण विधी सोहळा चिदानंद आळतेकर (गुरुजी) व त्यांच्या सहकार्याने केला .मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने सलग तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . मंदिराचा जीर्णोद्धार व सर्व सोहळा ओंकार कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच पंचक्रोशीतील अन्य मंडळांनी केला होता .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









