संमेलनाध्यक्षा सुजाता पेंडसे यांचे प्रतिपादन : सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणजे मराठी साहित्य संमेलन : बेळगुंदी येथे 19 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात
वार्ताहर/किणये
वाचनामुळे ज्ञान वाढते, शब्दांच्या छटा पुस्तकांतून दिसतात, नियमित वाचनामुळे मेंदूचे कार्य सुधारते. सध्या मनुष्य तणावग्रस्त बनला आहे. तो तणाव कमी करण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे. वाचनात एकाग्रता असली पाहिजे. आयुष्य जगताना शब्दांना फार महत्त्व आहे. त्यामुळे शब्द जपून वापरले पाहिजेत. पुस्तकी ज्ञान समाजाला देणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वाचन संस्कृती समृद्ध होते. त्यामुळे साहित्य संमेलनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मनोगत सोलापूर येथील ज्येष्ठ कवयित्री सुजाता पेंडसे यांनी बेळगुंदी येथे व्यक्त केले.
बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने 19 वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन रविवारी मरगाई देवस्थान परिसरात आयोजित करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्षा या नात्याने सुजाता पेंडसे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, अलीकडे मोबाईलचा वापर अधिक वाढला आहे. मोबाईलचा अतिरेक टाळला पाहिजे. सध्याच्या पिढीला पुस्तकांकडे वळविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सोशल मीडिया, युट्युब आदींच्या माध्यमातूनही वाचन संस्कृती जपता येते. याद्वारे विविध पुस्तकांचे वाचन तऊणांनी करायला हवे.
प्रत्येक गृहिणींनी आपल्या मुलांना पुस्तक वाचायला लावलं पाहिजे. याची सुरुवात घरातूनच झाली पाहिजे. सर्वांना आपल्या मातृभाषेचा अभिमान असायला हवा. वाचन संस्कृतीमध्ये पुस्तकांची निवड महत्त्वाची आहे. आत्मचरित्रांचे वाचन केल्यास आत्मविश्वास वाढतो. रामायण, महाभारत यासारख्या पवित्र ग्रंथांचे वाचन करून आपली संस्कृती जपली पाहिजे. तरुणांना मार्गदर्शक ठरेल असे लेखन साहित्यातून निर्माण होणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी चांगले साहित्य देणे गरजेचे आहे, असेही सुजाता पेंडसे म्हणाल्या.
लक्षवेधी ग्रंथदिंडी
रविवारी सकाळी रवळनाथ मंदिर येथून ग्रंथदिंडीला उत्साहात सुऊवात झाली. प्रारंभी रवळनाथ मूर्तीचे पूजन नामदेव गुरव व अऊण गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथपूजन पूजा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी पूजन ग्रा. पं. उपाध्यक्षा गीता ढेकोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. वीणा पूजन सरिता जाधव यांनी केले. ध्वज पूजन बालवीर सोसायटीच्या संचालिका रसिका पाटील यांनी केले. ग्रंथदिंडी पूजन बालवीर सोसायटीच्या संचालिका अनिता गावडा यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांचाही सहभाग
यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडीला सुऊवात झाली. ग्रंथदिंडीत वारकऱ्यांनी विविध अभंग सादर केले. ग्रंथदिंडीमध्ये बालवीर विद्यानिकेतनचे विद्यार्थी, आमदार आदर्श प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी तसेच विविध शाळा व हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महात्मा गांधीजी, श्रीकृष्ण, संत तुकाराम आदींच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन ग्रंथदिंडीच्या माध्यमातून झाले.
धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीचे पूजन ग्रा. पं. सदस्य महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथदिंडी हुतात्मा स्मारक येथे आली असता हुतात्मा स्मारकाचे पूजन बीजगर्णी ग्रा. पं. उपाध्यक्ष अॅड. नामदेव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण गावभर फिरून दिंडी मरगाई देवस्थान परिसरात आल्यानंतर जगद्गुऊ संत तुकाराम महाराज साहित्यनगरीचे उद्घाटन किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी सभागृहाचे उद्घाटन म. ए. समितीचे नेते मनोज पावशे यांच्या हस्ते करण्यात आले.
साहित्यिक प्रा. अजित सगरे व्यासपीठाचे उद्घाटन ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष दयानंद गावडा यांच्या हस्ते करण्यात आले. भारतमाता फोटो प्रतिमा पूजन बेळगुंदी ग्रा. पं. सदस्या रंजना गावडा यांच्या हस्ते करण्यात आले. रवळनाथ प्रतिमा पूजन ग्रा. पं. सदस्या निंगुली चव्हाण यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन विठ्ठल बागिलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती प्रतिमा पूजन माजी नगरसेविका नीलिमा पावशे यांच्या हस्ते करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर फोटो प्रतिमा पूजन गोल्याळी ग्रा. पं. अध्यक्ष नामदेव गुरव यांनी केले. संत तुकाराम प्रतिमा पूजन अश्विनी मंडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन हनुमंत कोदाळकर यांनी केले. कावळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा मोरे, उचगाव ग्रा.पं. अध्यक्षा मधुरा तेरसे, बालवीर सोसायटीच्या संचालिका रिता बेळगावकर, कावळेवाडी येथील वैशाली मोरे, सुरेखा पाटील आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बालवीर विद्यानिकेतनच्या
विद्यार्थिनींनी स्वागतम सुस्वागतम हे स्वागत गीत सुमधूर आवाजात सादर केले. स्वागताध्यक्षा भारती सुतार यांनी प्रास्ताविकातून बेळगुंदी गावच्या निसर्गरम्य परिसराचे वर्णन केले. सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणजे हे मराठी साहित्य संमेलन आहे, असे सांगितले. डॉ. भारती राजगोळकर, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. ऋतुजा पाटील, करुणा चव्हाण, शकुंतला बोकडे आदींच्या हस्ते साहित्य सरिताचे प्रकाशन करण्यात आले. काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांचा संमेलनात विशेष सत्कार करण्यात आला. संमेलनाचे उद्घाटन चंदगडचे नगरसेवक अॅड. विजय गडूळ यांच्याहस्ते करण्यात आले.
संमेलनांना नेहमीच पाठिंबा
अशा संमेलनांच्या माध्यमातून तऊण पिढीला पुस्तकांचे ज्ञान मिळते. त्यामुळे साहित्य संमेलने होणे गरजेचे आहे. अशा संमेलनांना आमचा नेहमीच पाठिंबा राहणार आहे, असे मनोगत मृणाल हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
एकपात्री प्रयोग 
संमेलनाच्या चौथ्या सत्रात रिळे, ता. शिराळा येथील विद्या पाटील यांनी ‘आम्ही जिजाऊ बोलतोय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. या प्रयोगाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्राबद्दल माहिती सांगितली.
पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्ती
नटसम्राट फेम सिनेकलाकार फुलचंद नागटिळक, निवृत्त मुख्याध्यापक मारुती, निवृत्त शिक्षक सी. आर. पाटील, डॉ. सुप्रिया शहापूरकर, डॉ. प्रियांका बाचीकर, सीए जीवणू शहापूरकर, सीए ओंकार सुतार, प्रा. सागर मोटणकर, श्रीनाथ बाचीकर, विश्वास घाटगे, सृष्टी पाटील, उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारप्राप्त माऊती चव्हाण आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
वंचितांचे दु:ख साहित्यातून मांडणे गरजेचे : चित्रा क्षीरसागर
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कवी संमेलन झाले. अध्यक्षस्थानी गोवा येथील चित्रा क्षीरसागर होत्या. यावेळी उस्मानाबाद येथील शशिकला गुंजाळ, सोलापूर येथील अलका सपकाळ, गोवा येथील प्रकाश क्षीरसागर, दयाताई मित्रगोत्री, उमेश शिरगुप्पे आदींचा सहभाग होता. मराठीची ज्योत सीमाभागात तेवत ठेवली जात आहे, असे उमेश शिरगुप्पे यांनी सांगून चिरतऊण मराठी ही कविता सादर केली. यावेळी नवोदित कवी जोतिबा नागवडेकर यांनी ‘येते आठवण आईची’, पी. के. मुचंडीकर यांनी क्रांतीज्योती, तसेच फुलचंद नागटिळक यांनीही कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. भारती सुतार यांनी ‘माझी वाट’, शकुंतला बोकडे यांनी स्वातंत्र्यदिनाला तिरंगा, किरण पाटील यांनी कळ्या फुलण्याआधी, दयाताई मित्रगोत्री यांनी पिंजरा, रोशनी उंद्रे यांनी बिनपगारी, स्मिता किल्लेकर यांनी ‘माझी सखी’ याचबरोबर एलन बोर्जिस, श्रावणी उघाडे, प्रा. मनीषा नाडगौडा, भक्ती बाळेकुंद्री, मनाली मराठे, संजय बंड आदींनी कविता सादर केल्या. लोकांना कविता पटली तर ती उत्तम कविता असते. अनुभवांतून व्यक्त होता आलं पाहिजे. कविता सोपी नाही. ती त्या भागातील भाषा, अनुभव व निसर्गावर अवलंबून असते. साहित्यिकांनी वंचितांचे दु:ख साहित्यातून मांडणे गरजेचे आहे, असे चित्रा क्षीरसागर यांनी सांगितले.
सुसंस्कारी समाज निर्माणासाठी प्रयत्न करा
आधुनिक युगात आजही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा समाज काही प्रमाणात आहे. अंधश्रद्धा, विद्रोह, जातीभेद, स्त्राr-भूणहत्या थांबली पाहिजे. गावच्या विकासासाठी सुसंस्कारित माणसे हवी आहेत. सुसंस्कारी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करा. यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे मनोगत संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सोलापूर येथील डॉ. स्मिता पाटील यांनी ‘महिलांसमोरील आव्हाने’ या व्याख्यानात व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, संस्कृतीचे भरण-पोषण स्त्राrच अधिक प्रमाणात करते. स्त्राr ही बुद्धिमान व आदिशक्ती मानली जाते. तिच्यात विचार करण्याची क्षमता आहे. संसाराचा अधिक भार स्त्राrकडेच असतो. आधुनिक युगात स्त्रियांनी आपल्या मुलींना उच्चशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे. सासू-सुनेचं नातं अधिक दृढ असायला हवं. त्यामुळे घरात अधिक समाधान मिळते. पूर्वी घटस्थापनेच्या दिवशी बीजपरीक्षण केले जात असे. अलीकडे मात्र नवरात्र उत्सवात नऊ रंगाच्या साड्या परिधान करण्यातच महिला अधिक धन्यता मानतात. कर्नाटकच्या या पावन भूमीत संत बसवेश्वर यांच्यासारखे संत होऊन गेले. त्यांनी मानवतेचा संदेश दिला आहे. आपण संस्कृतीची मूल्ये जपण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे, असेही डॉ. स्मिता पाटील म्हणाल्या.
वैचारिक लेखनाची गरज
स्त्रियांनी नकारात्मकता बाळगू नये. त्यांनी उदास राहणे टाळले पाहिजे. समाजाला सकारात्मक ऊर्जा साहित्य संमेलनांच्या माध्यमातून मिळते. साहित्यिकांनी वैचारिक लेखन करायला हवे, असे मनोगत संमेलनाच्या दुसऱ्या सत्रातील व्याख्यानात डॉ. मनीषा नेसरकर यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या, साहित्यातून वास्तव मांडायला हवे. साहित्यातून सामाजिक परिस्थितीची जाणिव होते. आपल्या देशात स्त्रियांनी महान क्रांती केलेली आहे. त्यांनी शेतातील विविध भाज्यांचा शोध लावला आहे. सध्या स्त्रियांनी साहित्य क्षेत्राकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. संत साहित्याचा अभ्यास करायला हवा. त्यामुळे जगण्याला वेगळी दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर संत जनाबाई, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दलही माहिती सांगितली. परमेश्वर आणि भक्त यांचे वेगळेच नाते असते, असे डॉ. मनीषा नेसरकर म्हणाल्या.









