सोशल मीडियावर एका हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक दांपत्याला 295 फुटांच्या उंचीवर हवेत लटकलेल्या अवस्थेत पाहिले जाऊ शकते. या दोघांसमोर एक धबधबा कोसळत असून अशा स्थितीतच दोघेही टेबलवर ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेताना दिसून येतात. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्रिस्टियाना हर्ट नावाच्या महिलेने आणि तिच्या रॅपर पार्टनरने शेअर केला आहे. ब्राझीलमध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा हवेत लटकलेल्या अवस्थेत खाता येऊ शकणाऱ्या या जागेबद्दल कळल्याचे क्रिस्टियानाने सांगितले आहे.

पार्टनरसोबत चालून प्रथम धबधब्यापर्यंत पोहोचले. यानंतर टेबलवर बसविण्यापूर्वी बॉडीवर स्ट्रिप्स बांधण्यात आल्या. टेबल वरून एका दोरखंडाने बांधलेले होते. मग येथे दोघांनी चीज, क्रॅकर्स, सँडविच अणि फळांचा आस्वाद घेतला. या 15 मिनिटांच्या अनुभवासाठी आम्हाला 5 हजार डॉलर्स (सुमारे 4 लाख रुपये) खर्च करावे लागले आहेत. या रकमेतूनच आमची छायाचित्रे काढण्यात आली आणि ड्रोनच्या मदतीने व्हिडिओ तयार करण्यात आला. या जागी खाण्यासाठी नव्हे तर या सुंदर दृश्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही आलो होतो, असे हर्टने सांगितले आहे.
जोडप्याने या ट्रिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. लोक स्वत:च्या आयुष्याशी खेळ करू लागल्याची कॉमेंट एका युजरने केली आहे. तर या ठिकाणी खाण्यासाठी पैसे मिळाले आहेत का, अशी विचारणा अन्य एका युजरने केली आहे.









