नवी दिल्ली :
इनिग्माची इलेक्ट्रिक स्कूटर एम्बियर एन 8 ही सादर करण्यात आली आहे. जवळपास दोन ते चार तासांच्या फास्ट चार्जिंगनंतर सदरची इलेक्ट्रिक दुचाकी सुमारे 200 किलोमीटरचे दमदार मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. इनिग्माची किंमत अंदाजे 1,05,000 ते 1,10,000 रुपयेच्या दरम्यान राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या मॉडेलच्या सादरीकरणानंतर इलेक्ट्रिक दुचाकीच्या क्षेत्रात ओला, टीव्हीएस व आयक्यूब मॉडेल्ससोबत स्पर्धा राहणार असल्याची माहिती आहे. विविध रंगामध्ये होणार उपलब्ध. गाडीमध्ये 1500 वॅटची मोटर राहणार आहे. यामध्ये सुमारे 45 किमी प्रतितास वेगाने गाडी धावणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय सेंट्रल लॉकिंग, यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फाइंड माय स्कूटर अशी अनेक आधुनिक फीचर्स कंपनीने उपलब्ध करून दिली आहेत.









