वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱयावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील किंग्जस्टन ओव्हल मैदानावर बुधवारी झालेल्या दुसऱया सामन्यात इंग्लंडने यजमान विंडीजचा 16 धावांनी पराभव केला.
या सामन्यात इंग्लंडतर्फे सोफिया डंकलीने 43 धावा जमविल्या. तर चार्ली डिनने 3 गडी बाद करून आपल्या संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 141 धावा जमविल्या. डंकलीने 43 धावांच्या खेळीमध्ये 1 षटकार आणि 2 चौकार मारले. डॅनी वेट आणि विनफिल्ड हे दोन फलंदाज लवकर बाद झाले. 10 षटकाअखेर इंग्लंडने 2 बाद 57 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडच्या बाऊचरने 24 धावा जमविल्या. सारा ग्लेनने 3 चेंडूत 10 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावाला ऍलेनीने चांगली सुरुवात केली. तिने पहिल्या षटकात 3 चौकार ठोकले. त्यानंतर ती पाचव्या षटकात बाद झाली. इंग्लंडच्या मॅथ्यूजने आपल्या फिरकी गोलंदाजीवर 3 गडी बाद केले. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर विंडीजला विजयासाठी 16 धावा कमी पडल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयामुळे इंग्लंडने या मालिकेत विंडीजवर आपली आघाडी मिळविली आहे.









