वृत्तसंस्था/ मँचेस्टर
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेत येथे 19 ते 23 जुलै दरम्यान होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी यजमान इंग्लंड संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून तिसऱ्या कसोटीत विजय मिळवलेला संघ कायम ठेवण्यात आला आहे.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले सलग दोन सामने जिंकल्यानंतर इंग्लंडने गेल्या आठवड्यात हेडिंग्लेची तिसरी कसोटी जिंकून मालिकेत आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. आता मँचेस्टरची चौथी कसोटी जिंकून इंग्लंडचा संघ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. त्यामुळे कदाचित या मालिकेतील ओव्हलची पाचवी आणि शेवटची कसोटी निर्णायक ठरू शकेल.
इंग्लंड संघ- स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, अँडरसन, बेअरस्टो, ब्रॉड, ब्रुक, क्रॉले, डकेट, लॉरेंझ, रॉबिनसन, रुट, टंग, वोक्स आणि मार्क वूड.









