वृत्तसंस्था/ रांची
चौथ्या कसोटी सामन्यात फिरकीस पूर्णपणे पोषक खेळपट्टीला सामोरे जाण्यास इंग्लंडची हरकत नाही. कारण खेळपट्टीने सुरुवातीपासून फिरकीपटूंना मदत केल्यास दोन्ही संघ एक समान पातळीवर येतील, असे मत इंग्लिश उपकर्णधार ऑली पोप याने व्यक्त केले आहे.
हैदराबाद, विशाखापट्टणम आणि राजकोटमधील कसोटीसाठीच्या खेळपट्ट्या या चांगल्या होत्या आणि प्रामुख्याने फिरकीला अनुकूल नव्हत्या. उलट प्रत्येकाला या खेळपट्ट्यांनी आधार केला पोपने येथे पत्रकारांशी बेलताना सांगितले की, बऱ्याच वेळा खेळपट्टी सुरुवातीला पाटासदृश असते आणि नंतर खराब होते. आम्ही पहिला सामना प्रथम फलंदाजी करून जिंकला, पुढील दोन सामन्यांत भारताने प्रथम फलंदाजी केली. किंचित पाटा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी केली म्हणून निकाल निश्चित होत नसला, तरी त्याचा फायदा होतो.
हैदराबादमधील इंग्लंडच्या नायकांपैकी एक असलेल्या पोपला वाटते की, फिरकीस पोषक खेळपट्टी त्यांनाही बळी घेण्याचा पर्याय उपलब्ध करून जाईल. आमच्याकडे काही तऊण फिरकीपटू आहेत. त्यांनी काही चांगल्या खेळपट्यांवर चांगली गोलंदाजी केली आहे. यामुळे आम्हाला नक्कीच बळी घेण्याची संधी आहे. त्यांनी पाटा खेळपट्ट्यांवरही चांगली कामगिरी केली आहे, याकडे त्याने लक्ष वेधले. पोपने स्वीपचा वापर करून भारतीय फिरकीपटूंविरुद्ध प्रभावी 196 धावांची खेळी केली होती आणि मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.
भारताने जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्याने यजमान अक्षर पटेलला चौथा फिरकीपटू म्हणून मैदानात उतरवतील असे पोपला वाटते. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स रांचीमध्ये गोलंदाजी करू शकतो असे संकेत मिळत आहेत. सुऊवातीला त्याने सांगितले होते की, या मालिकेत तो गोलंदाजी करणार नाही. पण जूनपासून गोलंदाजी न केलेल्या स्टोक्सने राजकोट कसोटीतील दणदणीत पराभवानंतर पुन्हा ती जबाबदारी पेलण्याचे संकेत दिले आहेत. वेगवान गोलंदाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू बुधवारी येथे सराव सत्रादरम्यान गोलंदाजी करताना दिसला. ‘तशी शक्यता नक्कीच आहे, पण त्याने चेंजिंग रूममध्येही अजून त्यास पुष्टी दिलेली नाही. मात्र आमच्या फलंदाजांविऊद्ध त्याने चांगली गोलंदाजी केली’, असे पोप त्यासंदर्भात बोलताना म्हणाला.









