वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
गतविजेत्या इंग्लंडला त्यांच्या आज रविवारी होणार असलेल्या शेवटच्या सुपर एट सामन्यात निराश झालेल्या, पण धोकादायक अमेरिकेचा सामना करताना त्यांच्या पॉवर हिटर्सची आवश्यकता लागेल. कारण टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीतील स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठॅ त्यांना मोठा विजय मिळविणे गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या शेवटच्या सुपर एट सामन्यात 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना मोठी फटकेबाजी करता आली नाही आणि शुक्रवारी त्यांना सात धावांनी पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजने अमेरिकेवर नऊ गड्यांनी विजय मिळविल्याने गटातील स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे इंग्लंडला त्यांची निव्वळ धावसरासरी वाढवण्यासाठी मोठा विजय नोंदवावा लागेल.
दक्षिण आफ्रिका सध्या गट-2 मध्ये दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडे प्रत्येकी एक विजय आणि एक पराभव आहे. विंडीजची धावसरासरी इंग्लंडच्या तुलनेत चांगली आहे. तथापि, कोणत्याही संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्याची सध्या तरी खात्री नाही आणि इंग्लंडला उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अमेरिकेवर 10 धावांनी किंवा किमान एक षटक शिल्लक असताना विजय मिळवावा लागेल.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)









