बेन स्टोक्स खास विश्वचषकासाठी एकदिवसीय सामन्यांच्या निवृत्तीतून बाहेर येत परतलाय आणि 2019 च्या स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या संघाचा गाभा बऱ्याच अंशी अबाधित राहिलाय…त्यामुळं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील भारतातील मोहीम आव्हानात्मक असली, तरी चषकावर आपलं नाव कोरण्याची स्वप्नं इंग्लंडला पडत असल्यास त्यात नवल नव्हे…
ग्लिश संघाकडे चार वर्षांपूर्वीच्या किताब मिळवून देणाऱ्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ताकद आणि विविधता निश्चितच आहे. परंतु ते परिस्थितीशी कसं जुळवून घेतात हे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. त्यांच्याकडे अपवादात्मक कौशल्यं असली, तरी ते फिरकी गोलंदाजांचा, विशेषत: आशियाई देशांच्या माऱ्याचा कसा सामना करतात त्यावर बरंच काही आधारून राहील. कारण आशियाई गोलंदाजांना अशा खेळपट्ट्यांचा फायदा कसा घ्यायचा हे चांगलंच माहीत असतं…
इंग्लंड साखळी फेरीतील नऊ सामने आठ ठिकाणी खेळणार असून यावेळी त्यांच्या काही खेळाडूंचा ‘आयपीएल’मधील अनुभवही बराच फायदेशीर ठरेल. जोस बटलरचा संघ 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात अहमदाबादमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल. त्यापूर्वी त्यांच्यासाठी दोन सराव सामने ठेवण्यात आले होते. पण बांगलादेशविरुद्धचा एकच सामना त्यांच्या वाट्याला येऊ शकला, तर भारताविरुद्धची लढत पावसात वाहून गेली. त्यामुळे विशेषत: फिरकीचा सामना करण्याच्या बाबतीत या लढतींचा जास्तीत जास्त फायदा घेऊन तयारी करण्याचे जे आराखडे संघाने बांधले होते त्यावर बऱ्याच अंशी पाणी पडलं…
इंग्लंडची फलंदाजी खूप खोलवर पसरलीय. आक्रमक पद्धतीनं खेळून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याची विकसित केलेली क्षमता त्यांना बाकीच्यांपेक्षा वेगळी बनवतेय. एकदिवसीय सामन्यांतील त्यांच्या वर्चस्वाचं हे मुख्य कारण राहिलंय. त्यातच फॉर्मात नसलेल्या जेसन रॉयच्या जागी हॅरी ब्रूकची भर पडल्यानं त्यांच्या ताकदीत आणखी वाढ झालीय. जोडीला इंग्लंडकडे ज्यो रूटसारखा दर्जेदार खेळाडू आहे हे विसरून चालणार नाहीये…याशिवाय त्यांच्याकडे बेअरस्टोसारखे असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना जागतिक स्पर्धा कशी जिंकायची याची चांगलीच कल्पना आहे. प्रतिस्पर्ध्यांपैकी फक्त ऑस्ट्रेलियाच असा आत्मविश्वास बाळगू शकते…
वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा राखीव खेळाडू राहणार असला, तरी इंग्लंडकडे मार्क वूडसारखा चांगला वेगवान गोलंदाज आहे, तर लेगस्पिनर आदिल रशीद भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरुप पाहता त्यांच्यासाठी अनेक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध निर्णायक ठरू शकतो. याबाबतीत त्यांना आणखी एक मदत मिळू शकते ती मोईन अलीची. शिवाय तो फलंदाजीतही बऱ्यापैकी योगदान देऊ शकतो…
इंग्लंडसाठी एक कमकुवत बाजू म्हणजे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघांप्रमाणं त्यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी कोणतीही विशिष्ट तयारी केलेली नाही. ते यंदा केवळ 10 ‘वनडे’ खेळलेत. त्यांचा सर्वांत अलीकडील अनुभव राहिलाय तो किवीविऊद्ध घरच्या मैदानावर झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेचा. ती इंग्लंडनं 3-1 फरकानं जिंकली. तर त्यांच्या आघाडीच्या खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. विश्वचषकापूर्वी महत्त्वाच्या खेळाडूंना फारसे एकदिवसीय सामने खेळण्याची संधी न मिळणं हा इंग्लंडच्या महत्त्वाकांक्षेत मोठा अडथळा ठरू शकतो. ते भारतात सुद्धा त्यांच्या पहिल्या सराव सामन्याच्या फक्त एक दिवस आधी पोहोचले…
इंग्लंडच्या फलंदाजीतील आक्रमक दृष्टिकोनानं मोठ्या प्रमाणात वाहवा मिळविलीय. पण स्पर्धा जसजशी पुढं सरकेल तसतशा अधिकच संथ होऊ शकणाऱ्या खेळपट्ट्यांवर त्याचा वापर कसा होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. इंग्लंडच्या एकदिवसीय सामन्यांतील उत्कृष्ट खेळाडूंच्या पिढीतील अनेक जण या संघात विसावलेत. त्यापैकी बहुतेकांचा हा शेवटचा विश्वचषक असेल. त्यामुळं आठवणीत राहण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना मिळणार नाही अन् ही बाब त्यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये भरपूर गाजलेल्या ‘बाझबॉल’ दृष्टिकोनाचा मुख्य भाग…
न्यूझीलंडविऊद्ध 124 चेंडूंत 182 धावांची खेळी करताना स्टोक्सनं एकदिवसीय सामन्यांमध्ये ‘बाझबॉल’ आणण्याचा आपला हेतू स्पष्टपणे दर्शविलाय. त्याचबरोबर तऊण वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन, ब्रूक आणि सॅम करन यांना इंग्लंड हळूहळू संक्रमणाकडे जात असताना त्यांचं स्थान मजबूत करण्याची वेळ आलीय याची चांगलीच कल्पना असेल…
यांच्यावर लक्ष ठेवा…
? बेन स्टोक्सची उपस्थिती ही इंग्लंडसाठी मोठी भक्कम बाजू. फलंदाजी आणि गोलंदाजीनंही सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. मधल्या फळीत येऊन आक्रमक फलंदाजी करण्यासाठी अन् महत्त्वपूर्ण बळी घेण्याच्या कौशल्यासाठी तो ओळखला जातो…
? सॅम करननं लहान वयातच डावखुरी स्विंग गोलंदाजी आणि तळाकडे येऊन आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर सर्व प्रकारांतील एक विश्वासार्ह अष्टपैलू म्हणून नाव कमावलंय. तो इंग्लंडसाठी एक महत्त्वाचा मोहरा बनलाय..
? जोस बटलर हाही केवळ संयम नि चतुरपणासाठी विख्यात असलेला कर्णधार नाही, तर फलंदाजीची स्फोटक शैली त्याला प्रचंड घातक बनविते…
विक्रमांचे विदेशी मानकरी…
? वेस्ट इंडिजचे व्हिव रिचर्ड्स हे विश्वचषकात एकूण 1000 धावांचा टप्पा पार करणारे पहिले फलंदाज. 30 ऑक्टोबर, 1987 रोजी कराचीतील पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यात त्यांनी 67 धावांची खेळी करताना हे ऐतिहासिक यश संपादन केलं. तेव्हापासून आणखी 20 फलंदाजांनी हा टप्पा पार केलाय…
? विश्वचषकात केवळ दोनच फलंदाजांना द्विशतक करण्याचा मान लाभलाय आणि दोघांनीही ही कामगिरी 2015 मध्ये एकाच स्पर्धेत नोंदविली. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं 24 फेब्रुवारी, 2015 रोजी कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) इथं झिम्बाब्वेविऊद्ध 215 धावा फटकावल्या, तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलनं 21 मार्च, 2015 रोजी वेलिंग्टन (न्यूझीलंड) इथं वेस्ट इंडिजविऊद्ध नाबाद 237 धावांची खेळी केली…
? 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानचा वासिम अक्रम हा विश्वचषकात एकूण 50 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्यानं 36 लढतींतून एकूण 55 बळी घेतले…तेव्हापासून फक्त तीन अन्य गोलंदाजांना हा महत्त्वाचा टप्पा ओलांडण्यात यश मिळालंय. यात समावेश आहे ऑŸस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा, श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन आणि लसिथ मलिंगा यांचा…
? विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये ग्लेन मॅकग्रा आघाडीवर विसावलाय. त्यानं 39 सामन्यांतून 71 बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियाच्या 1999, 2003 व 2007 मधील विजयांत मोलाचा वाटा उचलला…त्याच्या पाठोपाठ क्रमांक लागतो तो 30 लढतींत 68 बळी घेतलेल्या श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुरलीधरनचा तर तिसऱ्या स्थानावर 28 सामन्यांतून 56 बळी घेतलेला लसिथ मलिंगा…
? विश्वचषकात आजवर 10 गोलंदाजांनी हॅटट्रिक केलेली असून त्यात लसिथ मलिंगाचाही समावेश होतो. मात्र दोन वेळा अशी कामगिरी करून दाखविणारा तो एकमेव…एकदा 2007 साली दक्षिण आफ्रिकेविऊद्ध आणि नंतर 2011 मध्ये केनियाविऊद्ध मलिंगानं त्यांची नोंद केली. यापैकी 28 मार्च, 2007 रोजी गयानात दक्षिण आफ्रिकेविऊद्ध झालेल्या सामन्यात मलिंगानं चार चेंडूंत चार बळी घेतले…
? श्रीलंकेच्या चमिंडा वासनं देखील बांगलादेशविऊद्ध पीटरमेरिट्झबर्ग इथं 14 फेब्रुवारी, 2003 रोजी झालेल्या सामन्याच्या पहिल्याच षटकात पहिले चार बळी टिपत एक अनोखी कामगिरी केली. त्यानं पहिल्या तीन चेंडूंवर तीन बळी घेतले आणि नंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौथा बळी मिळविला…
? पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी हा विश्वचषकात पाच बळी घेणारा सर्वांत तरुण गोलंदाज. 5 जुलै, 2019 रोजी लॉर्ड्सवर त्यानं बांगलादेशविऊद्ध 35 धावांत 6 बळी मिळविले तेव्हा त्याचं वय होतं 19 वर्ष, 90 दिवस….
? विश्वचषकाच्या विक्रमांच्या पुस्तकात नेदरलँड्सच्या नोलन क्लार्क या नावालाही स्थान प्राप्त झालंय ते वेगळ्या कारणासाठी. 1996 च्या स्पर्धेत त्यानं बडोदा इथं न्यूझीलंडविऊद्ध पदार्पण केलं तेव्हा त्याचं वय होतं 47 वर्षे, 240 दिवस. अशा प्रकारे क्लार्क पदार्पण करणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला. त्यानंतर रावळपिंडीतील दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या आपल्या अंतिम सामन्यात तो झळकला तेव्हा 47 वर्षे, 257 दिवस वयानिशी या स्पर्धेत खेळलेला सर्वांत वयस्कर खेळाडू बनला…
? ऑस्ट्रेलियाचे रिकी पाँटिंग नि ग्लेन मॅकग्रा हे इतिहासातील असे दोनच खेळाडू जे 1996, 1999, 2003 आणि 2007 अशा चार विश्वचषक स्पर्धांच्या अंतिम फेरीत खेळलेत…









