मुंबई
पर्यायी पर्यावरणप्रेमी इंधन जसे हायड्रोजन, इथेनॉल आणि इतर इंधनाच्या प्रकल्पात लक्ष घालणाऱ्या इंजिनियर्स इंडियाचा समभाग 3 वर्षाच्या उच्चांकावर पोहचला आहे. गेल्या 7 आठवड्यात हा समभाग जवळपास 45 टक्के इतका वधारला असून कंपनीने गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देऊ केला आहे. बीएसईवर मंगळवारी इंजिनियर्स इंडियाचा समभाग 6 टक्के वाढत 103 रुपयांवर पोहचला होता. जानेवारी 2020 नंतर प्रथमच एवढी उंची गाठण्यात कंपनीला यश आलं आहे. 28 मार्च 2023 ला समभागाचा भाव 71 रुपये इतका होता.









