दिल्ली प्रतिनिधी :
देशात वीज संकट आणखी गंभीर रूप धारण करू शकते, असा इशारा CREA ने दिला आहे. या संशोधन संस्थेच्या म्हणण्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये याची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्याचबरोबर देशातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
सध्या, पिटहेड पॉवर स्टेशन्समध्ये कोळशाचा साठा 13.5 दशलक्ष टन आहे तर देशात सर्व पॉवर प्लांट्समध्ये 20.7 दशलक्ष टन आहे. पण मागणीचा विचार केला तर हा साठा कमी आहे. त्याचबरोबर त्याचा पुरवठा वेळेत होणे गरजेचे आहे.
कोळशावर चालणारे वीज प्रकल्प हे विजेच्या मागणीच्या वाढीला तोंड देण्याच्या स्थितीत नाहीत. भविष्यात वीज संकट टाळण्यासाठी, कोळसा वाहतुकीवर लक्ष केंद्रित करावे लागेल तसेच पर्यायी व्यवस्था करावी लागेल असे या संस्थेने नमूद केले आहे.








