आगामी पाच वर्षांसाठी गरज भासणार असल्याचे टाटा पॉवरच्या सीईओंचे मत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताच्या ऊर्जा क्षेत्राला पुढील पाच वर्षांत 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची आवश्यकता भासणार आहे. ही गुंतवणूक वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण या सर्व क्षेत्रात आवश्यक आहे. देशाच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन निधीचे मार्ग उघडण्याची गरज असल्याचे टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी प्रवीर सिन्हा यांनी एका समिटमध्ये सांगितले.
बोलताना सिन्हा म्हणाले, ‘पुढील पाच वर्षांत ऊर्जा क्षेत्राला 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची आवश्यकता आहे. यामध्ये निर्मिती, पारेषण आणि 5 लाख किमी ट्रान्समिशन लाईन्सचा समावेश आहे. हे भांडवल अनेक स्रोतांमधून उभारले जायला हवे. बँका प्रकल्पांना निधी देऊ शकतात. परंतु आपल्याला बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय दीर्घकालीन निधीची देखील आवश्यकता आहे.’
उद्योगाच्या विकासामागील कारणांबद्दल विचारले असता, त्यांनी वित्तपुरवठा हा एक संरचनात्मक अडथळा असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले, बहुतेक प्रकल्प 30-35 वर्षे जुने आहेत. अलीकडेच मी एक जलविद्युत प्रकल्प करत होतो जो 35 वर्षे जुना होता, परंतु भारतात कर्जाची कमाल मुदत 20 वर्षे आहे. आपल्याला 30-35 वर्षांसाठी निधी का मिळत नाही? भांडवल आणि निधीचा खर्च हे एक मोठे आव्हान ठरत आहे, विशेषत: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी.
वीज क्षेत्राची वाढती प्रगतीवर भाष्य
- 2015 मध्ये, आपल्याकडे 5 गिगावॅट सौर क्षमता
- आज 115 गिगावॅटपर्यंत 2030 पर्यंत ती 290 गिगावॅटपर्यंत वाढवण्याची योजना
- गेल्या वर्षी आम्ही 30 गिगावॅट अक्षय क्षमता जोडली
- परंतु चीनने एका वर्षात 400 गिगावॅट जोडली
- या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, 212 गिगावॅट जोडली
- भारतात दरडोई वीज वापर दरवर्षी फक्त 1,400 युनिट
- ग्रामीण भागातील घरांचा वीज वापर दरमहा 8-9 युनिट









