सोनपेठ येथे आयोजन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
बेळगाव : एनर्जी ईन मोशनच्यावतीने बुधवार दि. 8 रोजी सोनपेठ जिल्ह्यातील गनौर येथील दिल्ली इनलँड कंटेनर टर्मिनल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या सार्वजनिक ‘हेवी ड्युटी कमर्शियल ई-व्हेईकल बॅटरी स्वॅपिंग कम चार्जिंग स्टेशन’चे उद्घाटन केले जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते ‘ईआयएम फोटोन अश्व बॅटरी स्वॅपेबल हेवी ड्युटी ई-ट्रॅक्टर’चे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमामध्ये ईआयएम बॅटरी स्वॅप स्टेशन, रिन्युएबल एनर्जी आणि फायनान्सिंग सोल्युशन या व्यापक ऑफरद्वारे ग्रीन लॉजिस्टिक सोल्युशनचे महत्त्व समजून घेण्याची ही महत्त्वाची संधी आहे. लॉजिस्टिक व्यापार किंवा वाहतुकीबाबत माहिती घेणाऱ्यांना हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या क्षेत्रात आज व उद्याचे होणारे बदल याची सविस्तर माहिती मिळणार आहे.









