प्रतिनिधी /कुंभारजुवे
आखाडा येथील श्री पांडुरंग मंदिरात शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या चोवीस तासाच्या अखंड भजनी सप्ताहाची समाप्ती मोठय़ा उत्साहात व भक्तीभावाने झाली.
दि. 4 नोव्हेबर रोजी दुपारी 12 वा. सुरू झालेल्या दोन तासांच्या प्रत्येक गटातर्फे अखंड भजन करून सप्ताहाची सांगता 5 नोव्हेबर रोजी दुपारी 12 वा प्रसिद्ध गोमंतकीय गायक देवानंद दशरथ भोसले यांच्या गायनाने झाली. त्यावेळी त्यांना हार्मोनियमसाथ संजीव भोसले व तबला साथ राजेंद्र फडते यांनी केली. त्यानंतर यजमान सौ. नुतन व श्री. सुरज. चं. फडते यांच्या हस्ते आरती झाली व नंतर गांवचे पुरोहित राजेंद्र देसाई भटजी यांनी श्रीस गाऱहाणे घातले. तदनंतर गांवपण होऊन त्यात वार्षिक हिशोब सादर करुन त्यास मान्यता घेण्यात आली. यावेळी उत्सवाप्रित्यर्थ नाटकाची लॉटरी काढण्यात आली व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नंतर एक वर्षासाठी नवीन उत्सव समितीत अरुण. रा. भोसले, शैलेश. प्रे. वळवईकर, गोपाळ. र. नाईक, रोहिदास. सिं. नार्वेकर, रामानंद. ला. तारी, मिशाल. म. भोसले, मंदिप. म. नार्वेकर, पंकज. र. फडते, महेंद्र. वि. सावंत, अजित. अ. फडके याची निवड करण्यात आली. यानंतर पावणी, तीर्थप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता झाली.









