सातारा :
सातारा शहरात राजवाड्याच्यासमोर म्हणजे श्रीमंत छ. प्रतापसिंह हायस्कूलसमोर असलेली अतिक्रमणे हटवली. त्यानंतर तो परिसर मोकळा ढाकळा झाला. मात्र, सातारा बसस्थानकाच्या समोरचा फुटपाथ अक्षरशः टपऱ्यांसाठी आहे की चालणाऱ्यांसाठी हेच समजत नाही. दरम्यान, हुतात्मा स्मारकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत ही अवस्था असून कुठल्या तरी बोळातल्या भाईच्या वजनाने येथे टपऱ्या टाकल्या जातात. त्या टपऱ्यात काही खरेदी केल्यास चुकून वाद उद्भवल्यास ग्राहकास मार खाण्याशिवाय पर्याय उरत नसतो. त्यामुळे स्टॅण्ड परिसरात कोणतीही वरतू खरेदी करताना अनेकांची नकारघंटा असते. त्यातच अतिक्रमणाची दररोजची बजबजपुरी वाढत असून पालिकेच्या अतिक्रमण विभाग, हॉकर्स समिती आणि बांधकाम विभागाचीही चुप्पी असते.
सातारा शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय या दरम्यानचा ररता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्याच्या कडेने असलेल्या फुटपाथवर दोन्ही बाजूनी अतिक्रमणे झालेली पहायला मिळतील,ही अतिक्रमणे नेहमीच चर्चेचा विषय बनत असतात. आताही नुकत्याच आठवडद्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या समोरच फुटपाथवर एका बोळातल्या भाईच्या कृपेने लोखंडी पोल उभारुन तेथे शेड मारले आहे. तसाच प्रकार रटॅण्डच्या समोर बाजार समितीच्या बाजूला फुटपाथवरच हॉटेल सुरु केले आहे. त्याच हॉटेलला नेमकी कोणाची कृपा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, चिरीमिरीसाठी हॉकर्स समितीचे काही सदरय सुद्धा तोंडावर बोट आणि हाताची घडी ठेवतात अशी चर्चा आहे. दरम्यान, सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाला सुद्धा ही नवीन अतिक्रमण काढता येत नाहीत. त्यांच्यावर राजकीय दबाव आहे की पालिकेची हद्द येत नसल्याने त्यांना कारवाई करता येत नाही, अशीही चर्चा सुरु आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमण हटाव विभाग दमदार आहे परंतु त्यांच्या साहेबांचा आदेश नसल्याने त्यांच्याकडून ठोस कारवाई होत नाही त्यामुळे येथे दररोज अतिक्रमणे होत आहेत.
दररोज नव्याने कोणती तरी टपरी उभी राहताना दिसते. तर जुन्या टपऱ्या बंद असलेल्या हटवल्या जात नाहीत. स्टॅण्डच्या बाहेर चार ते पाच टपऱ्या या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे वाढत्या अतिक्रमणांना नेमका कोणाचा आर्शिवाद अशीही चर्चा सुरु आहे.
- महिन्याला भाडे घ्या पण आम्हाला टपरी टाकू द्या
सध्या सरकारी नोकऱ्या तर नाहीतच पण खाजगी नोकऱ्याही मिळेनात त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण पडेल तो व्यवसाय करु लागला आहे. थोडीसी व्यवसायाला जागा द्या, भले त्या जागेचे भाडे घ्या पण टपरी आम्हाला टाकू द्या, अशी साताऱ्यातल्या बोळातल्या भाईं मंडळींकडे करु लागली आहेत. भाईही टपरीची आणि जागेची व्यवस्था करुन देतात, मात्र, महिन्याचे भाडे व्यवस्थित दिले नाही तर त्या तरुणांची बरबादी केली जात असल्याची चर्चा ही सुरु आहे.








