कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापुरातील पन्हाळागडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण हटवण्यात आले आहे. पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले आहे. यांनतर किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदूत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी नऊ वाजता संपली. किल्ले पावनगडावरील अनाधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाच्या अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहेत. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.