न्हावेली / वार्ताहर
आरोस येथील विद्याविहार इंग्लिश स्कुल न कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अर्चना घारे परब यांच्या हस्ते स्पोर्ट्स युनिफॅार्मचे वाटप करण्यात आले. शाळेतील चिमुकल्यांपासून मोठ्या मुलांपर्यत सगळ्यांना हे स्पोर्ट्स युनिफॅार्म मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी बोलताना सौ. अर्चना घारे परब म्हणाल्या की,आपल्या सिंधुदुर्गातील विद्यार्थी अत्यंत हुशार व मेहनती आहेत. त्यांना जर योग्य मार्गदर्शन योग्य प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळाले तर ते क्रिडा क्षेत्रात देखील सिंधुदुर्गचे नाव रोशन करु शकतात. त्यामुळेच माझा नेहमी खेळांडूना मदत करण्यासाठी पुढाकार असतो मुंबई पुणे या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलांना देखील खेळाच्या विविध संधी मिळाल्या पाहिजे भारताची उद्याची भावी पिढी जर सुदृढ असेल तर देशाचे भवितव्य चांगले राहिल. जिल्ह्यात सर्वच खेळांसाठी सुसज्ज क्रिडा संकुल व नियमित प्रशिक्षक असावेत, त्यासाठी या पुढील काळात शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे आरोस शाळेतील विद्यार्थी भविष्यात आपल्या परिसराचे नाव उज्वल करतील, असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.
यावेळी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, उपाध्यक्ष हेमचंद्र सावळ, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर,संचालक प्रमिला नाईक, सचिव शांताराम गावडे, खजिनदार नारायण मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते दादा घोगळे, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, शिक्षक नीलेश देऊलकर, सुषमा मांजरेकर,अनुष्का गावडे,रुपा कामत, शालेय मुख्याध्यापक कु. मयुरी आरोसकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.