आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन, पेडणे येथे विविध स्पर्धांचे बक्षीसवितरण
प्रतिनिधी /पेडणे
पेडणेतील बालकलाकांना पुढे येण्यासाठी त्यांच्या आईवडिलानी त्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. पेडणेतील बाल कलाकारांना त्यांचे कलागुण दाखाविण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करुन लक्ष्मी क्रीडा, कला व सांस्कृतिक मंडळांने चांगले कार्य केले आहे. यापुढेही अशाच विविध स्पर्धा आयोजित कराव्यात, असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.
लक्ष्मी क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळ माऊसवाडा पेडणे, आयोजित पहिली नगरपालिका मर्यादित आकाशकंदील, वेशभूषा, रांगोळी आणि पाककला स्पर्धांच्या बक्षिसवितरण सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशिदास गावस, पेडणे श्री भगवती देवस्थान पंचायतनचे अध्यक्ष आदित्य देशप्रभू, समाजसेवक विष्णुदास कोरगावकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक मनोज हरमलकर, नगरसेविका राखी कशालाकर, अश्विनी पालयेकर, स्पर्धांचे परीक्षक सूर्यवंशीसर तसेच वासुदेव परब, पांडुरंग पार्सेकर, व कमल तहसिलदार उपस्थित होत्या.
यावेळी प्रवीण आर्लेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे-आकाशकंदील स्पर्धा ः प्रथम-सुरेखा किनळेकर, द्वितीय-गणेश सावळ देसाई, तृतीय-प्रथमेश शेटकर. रांगोळी स्पर्धा ः प्रथम-खुशी शिरोडकर, द्वितीय-कामाक्षी शिरोडकर, तृतीय-वैदवी किनळेकर, उत्तेजनार्थ-वेदिका तेली, श्रीया हरमलकर, सुरेखा किनळेकर.
वेशभूषा ः लहान गट प्रथम-सुरेखा किनळेकर, द्वितीय-रोहित निंबाळकर, तृतीय -राशी पेडणेकर. उत्तेजनार्थ-शौर्यता आंबेकर, मानसी गावस, सच्चिदा शेटकर. मोठा गट ः प्रथम-सिद्धता आंबेकर, द्वितीय-आदिती सावळ देसाई, तृतीय-वेदिका तेली. पाककला स्पर्धा ः प्रथम-प्रार्थना तुकोजी, द्वितीय-सवी सावळ देसाई, तृतीय- कांचन वराडकर. उत्तेजनार्थ तन्वी वराडकर, वैशाली शेटकर, साची कुडव.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या व इतर पाहुण्यांच्या हस्ते बालकलाकार सुरेखा किनळेकर व रोहित निंबाळकर तसेच क्रीडा शिक्षक किशोर किनळेकर व पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, आदित्य देशप्रभू, तुळशिदास गावस तसेच विष्णुदास कोरगावकर यांची भाषणे झाली. यावेळी दशावतारी नाटय़प्रयोग सदर झाला. सूत्रसंचालन ओंकार गोवेकर यांनी केले तर आभार किशोर किनळेकर यांनी मानले.









