ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरू आहे. काश्मीर पोलिसांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
अनंतनागमधील अनंदवन संगम भागात काश्मीर पोलीस आणि लष्कराचे जवान सातत्याने कारवाई करत आहेत. आज सकाळी या भागात लष्कराची शोधमोहिम सुरू असताना दहशतवादी जंगलाच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होते. यावेळी दहशतवाद्यांसोबत लष्करी जवानांची चकमक झाली. दहशतवाद्यांच्या तळावरुन काही प्रमाणात मुद्देमाल देखील जप्त करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. जंगल परिसरात पोलीस आणि लष्कराची शोध मोहीम सध्या सुरु आहे. यासंदर्भात अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.









