तीन नक्षलींना कंठस्नान : 400 सैनिकांनी नक्षलवाद्यांना घेरले
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील दंतेवाडा-बिजापूर सीमेवरील भैरमगड भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सैनिकांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीनंतर तिघांचेही मृतदेह हस्तगत करण्यात आले असून त्यांच्याकडील शस्त्रsही जप्त करण्यात आली आहेत. बिजापूरच्या इंद्रावती भागातील जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुमारे 400 सैनिकांना कारवाईसाठी पाठवण्यात आले होते, असे सांगत दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी चकमकीला दुजोरा दिला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत सैनिकांनी 146 नक्षलवाद्यांना ठार मारले आहे.









